| महाड । प्रतिनिधी |
रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट यांच्यातर्फे देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे संपन्न झाल्या. स्पर्धेत महाड तालुका आणि पोलादपुर मधील एकूण 14 संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी माई गांधी, सुधीर शेठ, मानसी मराठे, उमेश मिंडे, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या सर्व पदाधिकारी, महाड तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरिक्षक आवसरमोल, कांचन शेठ, डॅा. चेतन सुर्वे राजन मेहता उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी शेठ आणि प्रिया आदेश शहा यांनी केले. प्रास्तविक इसाबेला डिसूझा यांनी केले तर आभार जॉन्सन डिसूझा यांनी मानले.