| मुंबई | प्रतिनिधी |
ठाणे शहर विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व, पुणे ग्रामीण विरुद्ध नाशिक शहर या मुलांच्या, तर पुणे ग्रामीण विरुद्ध धुळे, पिंपरी चिंचवड विरुद्ध सातारा या मुलींच्या सामन्याने 52व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होईल. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने, पुणे जिल्हा कबड्डी असो.च्या यजमान पदाखाली पिंपरी चिंचवडच्या बोपखेल येथील श्रीरंग धोदाडे क्रीडानगरीत राकेशभाऊ घुले कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठान तसेच महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 4.00वा. या स्पर्धेला सुरुवात होईल. मुलांच्या अ, क, फ गटात, तर मुलींच्या क, ड, इ गटात बाद फेरी गाठण्याची चुरस होण्याची शक्यता वाटते. यंदा पुण्यात सामने असताना पुणेकरांना पहिल्या चार संघात स्थान मिळविण्याची संधी अधिक आहे. या स्पर्धेची गटवारी आज राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमांकरिता एका पत्रकाद्वारे जाहीर केली.
कुमार विभाग अ गट:- 1)ठाणे शहर, 2)लातूर, 3) मुंबई उपनगर पूर्व, ब गट :- 1)पुणे ग्रामीण, 2) अहमदनगर, 3)नाशिक शहर, 4)हिंगोली,क गट :- 1)रायगड, 2)बीड, 3)पालघर, 4)सिंधुदुर्ग,ड गट :- 1)सांगली, 2)रत्नागिरी, 3)नांदेड, 4)सोलापूर, इ गट :- 1)कोल्हापूर, 2)जालना, 3)धुळे, 4)सातारा, फ गट :- 1)नंदुरबार, 2)पिंपरी चिंचवड, 3)औरंगाबाद, 4)उस्मानाबाद, ग गट :- 1) मुंबई उपनगर पश्चिम, 2)पुणे शहर, 3)नाशिक ग्रामीण, 4) मुंबई शहर पूर्व, ह गट :- 1)परभणी, 2)ठाणे ग्रामीण, 3) जळगांव, 4) मुंबई शहर पश्चिम, कुमारी विभाग:- अ गट:- 1)पुणे ग्रामीण, 2)रायगड, 3)धुळे, ब गट :- 1)पिंपरी चिंचवड, 2) मुंबई शहर पश्चिम, 3)सातारा, 4)बीड, क गट :- 1)अहमदनगर, 2)कोल्हापूर, 3)रत्नागिरी, 4)लातूर, ड गट :- 1)ठाणे शहर, 2)पालघर, 3)ठाणे ग्रामीण, 4)हिंगोली, इ गट :- 1)परभणी, 2)नंदुरबार, 3) मुंबई उपनगर पश्चिम, 4)नांदेड, फ गट :- 1)नाशिक ग्रामीण, 2)सांगली, 3)सोलापूर, 4)औरंगाबाद, ग गट :- 1) मुंबई शहर पूर्व, 2) मुंबई उपनगर पूर्व, 3)उस्मानाबाद, 4)सिंधुदुर्ग, ह गट :- 1)जालना, 2)पुणे शहर, 3)नाशिक शहर, 4) जळगांव या जिल्ह्यांचा समावंश आहे.







