| उरण | प्रतिनिधी |
महाविकास आघाडीचे नवघर जिल्हा परिषद गटातून उभे असलेल्या प्रेरणा पाटील, भेंडखळ पंचायत समिती गणातून उभे असलेले उमेदवार दीपक भोईर व नवघर पंचायत समिती गणातून उभे असलेले उमेदवार परेश ठाकूर हे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. हे तिन्ही उमेदवार आपापल्या परिसरात व विभागात जोरदार प्रचार करत असून प्रत्येक घराघरात जाऊन नागरिकांशी उत्तम संवाद साधत आहेत. प्रचारादरम्यान त्यांना जनतेचाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणारे व जनतेच्या समस्या सोडणारे उमेदवार असल्याने नागरिकांनी या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. गावोगावी व घरोघरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे स्वागत करण्यात येत आहे. या तिनही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून या उमेदवारांचा विजय हा निश्चित मानला जात आहे.
मविआच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा
