| रत्नागिरी | प्रतिनिधी |
संगणक प्रशिक्षणात अग्रगण्य असलेल्या नागपूर येथील ऑल इंडिया कौन्सिल फॉर प्रोफेशनल एक्सलन्स या संस्थेतर्फे राजापूर तालुक्यात संगणक प्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्या ओंकार कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला दी ग्रोथ अचिवर्स हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री रितू शिवपुरी यांच्या हस्ते ओंकार इन्स्टिट्यूटच्या संचालिका सुगंधा पुजारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी एआयसीपीचे मॅनेजिंग डायरेक्टर शरद तिवारी, कविता तिवारी आदी उपस्थित होते. 30 वर्षापूर्वी पुजारी यांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना संगणक प्रशिक्षण दिले. संगणकीय कौशल्याच्या जोरावर अनेकांनी शासकीय नोकरीही मिळवली आहे. त्याची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.