। म्हसळा । वार्ताहर ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक पाष्टी या शाळेत मुख्याध्यापक सुदाम माळी यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळ्यातील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या विद्यमाने डिजीटल साक्षरता अभियान तसेच बचत, विमा व बँक व्यवहार याविषयी मार्गदर्शन प्रशिक्षण संपन्न झाले.
यावेळी, पैसे वाचवणे व योग्य पद्धतीने बचत करणे म्हणजे पैशाला पैसा जोडणे या शब्दात रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक. शाखा म्हसळाचे व्यवस्थापक मंगेश मुंडे यांनी शाळेतील पालकांचे व ग्रामस्थांचे उद्बोधन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार लेखी व कृती सह शैक्षणिक कर्ज हे विषय समजावून सांगितले. तसेच, जमलेल्या शेतकरी, वृद्ध, महिला, भगिनी व ग्रामस्थांना बचत गट, आरडी, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना, बचत, कर्ज योजना, स्वयंरोजगार कर्ज योजना, विविध ठेवी योजना इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
हा उपक्रम व कार्यक्रम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक सुदाम माळी, शिक्षक प्रफुल्ल पाटील, बिलाल शिकलगार, ललित पाटील, विनयकुमार सोनवणे, संदिप दिवेकर, चिराग शिर्के, रूची निवाते व विवेक मांढरे यांनी अथक प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी पाष्टी हायस्कूलचे शाळा समिती अध्यक्ष राजाराम धुमाळ, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष राजाराम दिवेकर, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकचे बँक व्यवस्थापक मंगेश मुंडे, विजय पयेर, संदेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कर्तव्या दुर्गवले, माजी सरपंच चंद्रकांत पवार, पोलिस पाटील स्नेहा पवार, प्रीती म्हशिलकर, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.