श्रीया फाऊंडेशनतर्फे मार्गदर्शन शिबीर

| उरण । वार्ताहर ।

उरण पूर्व विभागातील तरुणांसाठी कॉमन सर्विस सेंटर (CSC) व श्रीया फाऊंडेशन पाले यांच्यावतीने सरकारी नोकरी, महाराष्ट्र पोलीस भरती व सरळसेवा भरती पूर्व प्रशिक्षण यांचे मार्गदर्शन शिबीर श्रीया अकॅडेमी, कोप्रोली चौक, कोप्रोली येथे रविवार (दि.9) रोजी दुपारी 3.00 ते 4.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

उरण पूर्व विभागात प्रथमच सरकारी नोकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जी काळाची गरज आहे. मार्गदर्शन करण्यासाठी सलग नऊ वर्ष भारताचे प्रतिनिधित्व केलेले प्रसिद्ध अँथलेटिक्स, पोलीस सबइन्स्पेक्टर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. हे मार्गदर्शन सर्वांना मोफत आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी व पालकांनी या सरकारी नोकरी मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृपया मर्यादित जागा असल्यामुळे अगोदर फोन करून आपली जागा पक्की करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा :- कॉमन सर्विस सेंटर, श्रीया अकॅडमी, आधार नोंदणी केंद्र, युनियन बँके जवळ, कोप्रोली – उरण. फोन नंबर -9004763339, 9892159495, 9930253174

Exit mobile version