| अलिबाग | प्रतिनिधी |
नारळ विकास मंडळ कृषक कल्याणकारी संस्था चौल यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ विकास मंडळाच्या विविध योजनावर मार्गदर्शन चौक मुख्य मुखरी गणपती मंदिरात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नारळ विकास मंडळाचे उपसंचालक रविंद्रकुमार विकास अधिकारी होते. त्यांनी नारळ बागायतदारांना विविध योजनाची माहिती दिली, तसेच लवकरच नारळ उत्पादन वाढण्याचे उदिष्ट डोळयासमोर ठेवून शेतकऱ्यांना खत वाटपाचा कार्यक्रम राबिण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक-संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले. संस्थेचे प्रशिक्षण अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी नवीन लागवड करण्याविषयी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासन कृषिविभाग रायगडचे अलिबाग तालुक्याचे मंडळ अधिकारी सुर्यवंशी यांनी शास्त्रोकत्त नारळ लागवडीचे महत्व सांगितले.
याप्रसंगी अनेक शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रकाश पाटील यांनी केले.







