। पेण । प्रतिनिधी ।
पेण येथील सोबती संघटनेचे संस्थापक माजी अध्यक्ष ॲड. बापूसाहेब नेने यांच्या मार्गदर्शनाखाली सोबती संघटना लहान विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी एका अनोख्या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये सप्तसूत्री कार्यक्रमाचा वापर करुन लहान विद्यार्थ्यांच्या मनावर सुयोग्य परिणाम होतील याचा विचार करुन पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये 1. मुलांचा नैसर्गिक विकास 2. सकारात्मक पालकत्व 3. मोबाईल टीव्ही आणि स्क्रीन टाईम 4. राग, हट्ट आणि टॅन्ट्र म्स हाताळणे 5. रोजची सवय लावणे 6. भावनिक समज आणि आत्मविश्वास 7. शाळेची तयारी आणि प्राथमिक शिक्षण या सप्तसूत्रीचा वापर करुन लहान विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम केल्यास त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात, अशा प्रकारचे मार्गदर्शन डॉ. तुषार पाटील मानसोपचार तज्ज्ञ यांनी केले व काही त्यासाठी प्रात्यक्षिकदेखील दाखवण्यात आली.
या कार्यक्रमासाठी संस्थापक सोबती संघटना ॲड. बापूसाहेब नेने, अध्यक्ष सोबती संघटना व अध्यक्ष पेण एज्युकेशन सोसायटी ॲड. मंगेश नेने, सेक्रेटरी सोबती संघटना डॉ. ॲड. नीता कदम, सदस्य सोबती संघटना प्रितेश दोशी, उपाध्यक्ष पेण एज्युकेशन सोसायटी संजय कडू, प्रशासकीय अधिकारी पेण एज्युकेशन सोसायटी दिगंबर चिंचणीकर, पेण एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापिका लेखा ठाकूर, पेण एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल या मुख्याध्यापिका रोहिणी म्हात्रे तसेच भाऊसाहेब नेने महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता पहिलीचे पालक उपस्थित होते.







