लष्करभरती संदर्भात सोल्जर मयुरेश गावंड यांचे मार्गदर्शन

। अलिबाग । शहर वार्ताहर ।
नगरातील स्पर्धा विश्‍व अकॅडमीच्या अभ्यासिकेत लष्करभरती संदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय लष्कर सेवेतील जवान मयुरेश गावंड यांनी उपस्थितांचे भारतीय लष्कर सेवा आणि भरती प्रक्रिया यासंदर्भात मागर्र्दर्शन केले.
जिल्ह्यातील युवावर्ग मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून, याकामी स्पर्धा विश्‍व अकॅडमी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आणि याच पार्श्‍वभूमीवर अकॅडमी विविध स्तरावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून, मानवी हक्क दिनानिमित्त लष्करभरती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत लष्करप्रमुख बिपीन रावत यांना आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात राष्ट्रसेवक म्हणून काम पाहताना किंवा त्यासाठी भारतीय सेवेत रुजू होताना सर्वप्रथम आत्मिक विकासाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मयुरेश गावंड यांनी केले. तर शारीरिक सुदृढता, सकस आहार, व्यायाम यासंदर्भात राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनाअंती उपस्थितांच्या शंकाकुशंकाचे निरसण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमीच्या संचालिका सूचिता साळवी, सूत्रसंचालन मानसी नागावकर तर आभारप्रदर्शन प्रतिक कोळी यांनी केले.

Exit mobile version