| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शिवसेना शहर शाखेतर्फे अपघाती विमा योजना मार्गदर्शन शिबीराचे आयोजन 15 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. भारतीय टपाल (पोस्ट ऑफीस) सेवेची 399 रुपयांची अपघाती विमा योजना जास्तीत जास्त नागरीकांपर्यत्त पोहचवण्याच्या उद्देशाने सदर मार्गदर्शन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी टपाल खात्यातील तीन कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी या ठिकाणी भेट देऊन या योजनेची माहिती घ्यावी तसेच सोबत पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅनकार्डचे झेरॉक्स घेऊन यावे. सदर कार्यक्रम सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत्त सुरु राहणार असल्याची माहिती प्रविण जाधव यांनी दिली आहे.