भ्रष्टाचार निर्मूलन कायदा विषयावर मार्गदर्शन

। पेण । वार्ताहर ।
तहसील कार्यालय पेण येथे शिक्षणाचा अधिकार व भ्रष्टाचार निर्मुलन कायदा या विषयावर मार्गदर्शन या 10 नोव्हेबर रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन माजी जिल्हा सरकारी वकिल प्रसाद पाटील यांनी आपल्या पाल्यांना शिक्षण व त्यासोबत संस्कार कशा प्रकारे दयावे याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी लोकसेवकांना लाच न घेण्याचे आवाहन केले व भ्रष्टाचार निर्मुलन कायदाविषयी माहिती करून दिली तसेच पेण बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.एन.एन.म्हात्रे यांनी उपस्थित सर्व तहसिल, पंचायत समिती, पोलीस कर्मचारी, यांना तालुका विधी सेवा समितीचे कार्य याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल म्हात्रे यांनी केले. सदर कार्यक्रमास पेण तालुक्याच्या तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, सरकारी वकिल सतिश नाईक, पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ पंचायत समिती मधील कर्मचारी, न्यायालयातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version