| पाली/गोमाशी | वार्ताहर |
मुख्यमंत्री माझी शाळा सूंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत नांदगाव विद्यालयात बँकेचे व्यवहार मार्गदर्शन तसेच शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आरडीसीसी बँक पाली शाखेचे व्यवस्थापक डी. के. देशमुख यांच्या हस्ते विज्ञान ज्योत पेटवून करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारा बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भावी नागरिक असतात. विद्यार्थ्यांना बचत करण्याची सवय लागली पाहिजे. त्यामुळे त्यानी बचत केलेल्या पैशातून शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय खर्च,आपल्या गरजा पूर्ण करता येऊ शकतात. विद्यार्थ्यांना बँकेच्या विविध खात्याच्या प्रकारांची तसेच विविध बँका विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देतात या बाबत सखोल माहिती सांगितली. दैनंदिन जीवनात आपण आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी जिपे, उपीआय,भीम अँप, एटीएम, एनएफटी, आरटीजीसच्या माध्यमाचा वापर करतो. मात्र हे व्यवहार करण्यासाठी वापरण्यात येणार्या पिन नंबर, ओटीपी नंबरचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमची मोठया प्रमाणावर आर्थिक फसवणूक होऊ शकते. तसेच विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सा, निरीक्षण क्षमता विकसित होऊन बाल वैज्ञानिक निर्माण होऊ शकतात असे बँक व्यवस्थापक देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी बँक व्यवस्थापक डि.के देशमुख, प्राचार्य संभाजी ढोपे बँकेचे कर्मचारी प्रशांत जोशी, शिक्षक वृंद उपस्थित होते.