। रोहा । प्रतिनिधी ।
खांबेरे ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाड्यांमध्ये पौष्टिक आहाराबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. रोजच्या जेवणात पालेभाज्या ,फळभाज्या,डाळी व कडधान्ये यांचा समावेश असल्यास महिला तसेच मुलांचे आरोग्य चांगले राहू शकते.प्रथिने तसेच रक्तातील लोहाची कमतरता राहू नये यासाठी कोणत्या भाज्या उपयुक्त आहेत. प्रथिनांची गरज कशा प्रकारे पूर्ण करता येते याबाबत महिलांना ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी ताईंनी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत हद्दीतील खांबेरे,टेमघर,डिंगणवाडी,गायचोळ,बिरवाडी, पांगळोली या अंगणवाडी केंद्रात सदर मार्गदर्शन देण्यात आल्याची माहिती सरपंच गिता वारगुडे व ग्रामसेवक आर पी पाटील यांनी दिली आहे.