माहिती अधिकारा बाबत मार्गदर्शन

। अलिबाग । वार्ताहर ।
जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्ताने बुधवार (दि.28) रोजी पनवेल येथील काँग्रेस भवन हॉलमध्ये जनजागृती ग्राहक मंच रायगड, पनवेल शाखा व पनवेल तालुका सेवानिवृत्त सेवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान आयोजित केले होते. सदरच्या कार्यक्रमास संस्थेचे के.एल.जाधव, सुभाष फडके, बी.पी.म्हात्रे, राजकुमार ताकमोघे, रमेश चव्हाण, शिवदास पालकर, संतोष विचारे, विजय गायकर, श्रीकांत पाटील, एस.एम.पाटील, चंद्रकांत नवगिरे, यशवंत सकपाळ उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील जवळपास शंभराहून अधिक पुरुष व महिला नागरीक उपस्थित होते. माहिती अधिकार तज्ञ अनिल गल्ली यांनी मार्गदर्शन केले. गल्ली यानी 2005 साली सुरू झालेल्या माहितीचा अधिकार माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.पी.म्हात्रे यानी केले.सूत्रसंचालन विजय गायकर यांनी केले तर शिवदास पालकर यांनी आभार मानले.

Exit mobile version