। रसायनी । वार्ताहर ।
पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.12) प्रिया स्कूल मोहोपाडा येथे रोटरी ग्रीन सोसायटी प्रोजेक्ट 2024 चे आयोजन करण्यात आले होते.
ग्रीन सोसायटी प्रकल्पाची पहिली पायरी म्हणून, सोसायट्यांसाठी सकाळी 10 ते 1 जनजागृती सत्रांचे नियोजन केले होते. यावेळी सादरीकरणे, चर्चा आणि वन टू वन चर्चा करण्यात आली. तसेच, हरित उपक्रमांतर्गत तज्ञ/एनजीओ/पुरवठादार सोसायट्यांना काय करावेफ आणि ‘कसे करावे’ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्या संस्थांनी यापूर्वी हरित समाज किंवा पर्यावरणासाठी उपक्रम सुरू केले आहेत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्लास्टिक बंदी जनजागृती म्हणून कापडी बॅगेचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मंजू फडके, केशव ताम्हणकर, मोना शहा, सचिन माळेकर, अरुण गोविंद जाधव, रेश्मा कुरूप, लक्ष्मण मोरे, गणेश काळे, अमित शहा, गणेश वर्तक, दीपक जाधव, प्रदिप पाटील, सचिन मालकर, सुनिल कुरुप, डॉ.बिना रेगे, बाळकृष्ण होनावले व पत्रकार उपस्थित होते.