| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिक संघ, पनवेल यांच्या साप्ताहिक सभेच्या निमित्ताने पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने तसेच पो हवा येळे व पो हवालदार मुलाणी अंमलदार उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक नियमनासंदर्भातील विविध अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी, पादचारी मार्गाचा योग्य वापर, सिग्नलचे नियम, तसेच वाहनचालकांकडून होणाऱ्या वाहतूक नियमभंगामुळे उद्भवणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांना पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी समर्पक उत्तरे देत आवश्यक सूचना केल्या. पनवेल शहर वाहतूक शाखेच्या या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती होऊन त्यांच्या सुरक्षिततेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.







