मत्स्य व्यवसायाविषयी मार्गदर्शन कार्यशाळा

। उरण । वार्ताहर ।
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेज महालन विभाग फुंडे उरण येथे जागतिक कौशल्य विकास दिनानिमित्त ‘मत्स्यव्यवसायात उद्योजकता संधी’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमास तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. विवेक वर्तक, खारलँड रिसर्च सेंटर, पनवेल, मत्स्य शास्त्रज्ञ उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. विवेक वर्तक म्हणाले की, मत्स्य व्यवसाय हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्यामध्ये आपण खेकडे, जिताडा, तिलापिया, कल्प मासा व कोलंबीचे संवर्धन करून व्यवसाय करू शकता. मत्स्य सेवा केंद्रासाठी शासनाची साधारणपणे दहा लाखांचे अनुदान उपलब्ध आहे. त्याचबरोबर त्यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणार्‍या घटकांची माहिती अतिशय सोप्या शब्दात करून दिली व मत्स्यव्यवसाय करण्यासाठी लागणारे सर्व सहकार्य खारलँड रिसर्च सेंटर करेल, असे आश्‍वसन दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनील जगधनी यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांची तसेच खारलँड सेंटरची ओळख कार्यक्रम समन्वयक डॉ. आमोद ठक्कर यांनी करून दिली.कार्यक्रमाचे आभार आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. आर.बी. पाटील यांनी केले. प्रा. दिक्षिता ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य डॉ. विलास महाले, डॉ.झेड.सी. झेंडे, प्रा.भूषण ठाकूर, प्रा. दिलीप केंगार, प्रा. राम गोसावी, प्रा. डॉ. सोनावणे यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेस सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version