। अलिबाग । वार्ताहर ।
10 वी,12 वी, पदवी परीक्षा नंतर बहुतांश विध्यार्थ्यांना पुढे काय करायचे, कशात करियर करायचे या समस्येला सामोरे जावे लागते. या वयातील आणि अशा स्वरूपाच्या समस्यांना सामोरे जाणार्या विध्यार्थ्यांकरीता गेली काही वर्षे स्वयंसिद्धा संचलित स्पर्धा विश्व अकॅडेमी जिल्ह्यातील विर्द्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम राबवित असून त्यांना विविध स्पर्धा परीक्षा संदर्भात माहीती देऊन आशा उमेदवारांना मदत करत आहे. आजपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील जवळपास 850 हुन अधिक उमेदवारांना अभ्यासरूपी मेहनतीने व संस्थेच्या मार्गदर्शनामुळे सरकारी नोकरी मिळविता आली आहे.
या संदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी यांनी अलिबाग स्थित स्पर्धा विश्व अकॅडेमीला सदिच्छा भेट दिली. व उपस्थित विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, कोणत्या वयात तयारीला लागावे, परीक्षेचे बदलणारे स्वरूप, शासनाकडून घेतल्या जाणार्या परीक्षा या संदर्भात उत्तम मार्गदर्शन केले.
जिल्ह्याधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शन वर्ग तथा अभ्यासिका उपलब्ध झाली असून त्याचा लाभ विध्यार्थीनी घ्यावा असेही सांगितले. यावेळी तपस्वी गोंधळी, सुचिता साळवी यांचे कौतुक केले.