हृदयरोग दिना निमित्त मार्गदर्शन

। उरण। वार्ताहर ।
हृदयरोग दिनाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील प्रसिद्ध मधुमेह तज्ञ हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल साठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी हार्ट अटॅक येऊ नये, डायबेटीस होऊ नये, डायबेटीस झाल्यावर काय काळजी घ्यावी, हार्ट अटॅक आल्यावर काय करावे, डायटचे महत्व, शरीराची निगा कशी राखावी इत्यादी अनेक गोष्टी बद्दल डॉ राहुल साठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मॉर्निंग कट्टा विमला तलाव उरणचे संस्थापक सुबोध दर्णे, प्रकाश दांडेकर, उल्हास मोकाशी, अनंता पाटील, दिलीप महाडिक, सुनील घरत, अ‍ॅड. मछिंद्र घरत, हरमन फर्नांडिस, अजय शिवकर, बाबुलाल, अशोक म्हात्रे, प्रदीप खैरे, लक्ष्मण सेवक, जनार्धन म्हात्रे, अशोक पालकर,चिटणीस मॅडम, राणी आदी उपस्थित होते.

Exit mobile version