| उरण | वार्ताहर |
काँग्रेस पक्षातर्फे निवडून आलेल्या सर्वं सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व निवडणूक लढवलेलें सर्वं सदस्य यांच्या सत्कार व अनेकांनी यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या हस्ते भोईर हॉटेल (कोटनाका) येथे झालेल्या कार्यक्रमास डॉ. मनीष पाटील, मिलिंद पाडगावकर, विनोद म्हात्रे, प्रकाश पाटील, गणेश सेवक, अकलाख शिलोत्री, रामनाथ पंडित, जयवंत पाटील, किरीट पाटील, कमलाकर घरत, अशोक ठाकूर, गणेश म्हात्रे, रेखा घरत, अफशा मुकरी आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उरण तालुका काँग्रेस कार्यालयात हाडांचे मोफ़त आरोग्य शिबिर उरण शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित केले होते. त्या शिबिराचे उदघाटन जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँगेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणात उत्साह होता.
यावेळी मार्गदर्शन करताना महेंद्र घरत यांनी आगामी होऊ घातलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उरण विधानसभेचा आमदार काँग्रेसचा असेल असा विश्वास यावेळी घरत यांनी व्यक्त केला. प्रस्ताविकात तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी काँग्रेस पक्षाची तालुक्यात वाढत असलेली ताकद व पक्षात येणार्यांची संख्याही आता वाढत चालल्याने तालुक्यात काँग्रेस पक्ष पुन्हा 1 नंबरवर येईल असा विश्वास व्यक्त केला.