आकार मार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

पोलादपूर तालुक्यातील कापडे बु. येथील श्री वरदायिनी विद्यालय व आकार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.13) विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सलागरे व पदाधिकारी यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या ध्यासातून हे मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला होतो. यावेळी इ. पाचवी, आठवी स्कॉलरशीप व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सर्वश्री आवारे, कुमठेकर, जाधव, खैरनार, माळी या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक लवटे, सलागरे, जंगम, भांडलकर हे अध्यापक उपस्थित होते.

Exit mobile version