लखनऊचा दारुण पराभव

गुजरातची ‘प्ले ऑफ’मध्ये भरारी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातने लखनऊवर 56 धावांनी विजय मिळवला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 2 बाद 227 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ 20 षटकांत 7 बाद 171 धावाच करु शकला. गुजरातच्या विजयात साहा-गिल आणि मोहित शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

228 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाची सुरुवात शानदार झाली. सलामीला आलेल्या काईल मेयर्स आणि क्विंटन डी कॉकने सुरेख सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 8.2 षटकांत 88 धावांची भागीदारी केली. काईल मेयर्सने 32 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 धावांची खेळी करुन बाद झाला. त्याचे अवघ्या दोन धावांनी अर्धशतक हुकले. त्यानंतर अन्य फलंदाजांना काही किमया दाखविता आली नाही. शेवटी 171 धावांवर लखनऊला रोखण्यात गुजरातच्या गोलंदाजांना यश आले.

Exit mobile version