| डलास | वृत्तसंस्था |
अमेरिकेने टी-20 विश्वचषकाच्या एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानला हरवले. या सामन्यामध्ये अमेरिकेच्या विजयात काही भारतीय वंशाचे खेळाडू हिरो ठरले आहेत. या टीममध्ये एक असा खेळाडू होता. ज्याने एमएस धोनीसारखा खेळ केला आणि अमेरिकेला विजय मिळवून दिला.
अमेरिकेच्या डलासमध्ये 6 जूनला पाकिस्तान विरुद्ध अमेरिका सामना झाला. हा 11 वा सामना होता. असा निकाल लागेल, त्याची कोणी कल्पनाच केली नव्हती. अमेरिकेसारख्या नवख्या संघाने बलाढ्य पाकिस्तानला पराभवाच पाणी पाजले. त्यामुळे या पराभवाची सर्वाधिक चर्चा होत आहे. दोन्ही संघामध्ये 40 ओव्हरची मॅच झाली. पण निकाल लागू शकला नाही. म्हणून 41 वी म्हणजे सुपर ओव्हर झाली. त्यातून सामन्याचा जो निकाल लागला. त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. एक मोठा उलटफेर झाला. त्यात अमेरिकेचा कॅप्टन मोनंक पटेलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी प्लेयर ऑफ द मॅच म्हणून त्याची निवड झाली. या सामन्यात मोनंक पटेल अमेरिकेसाठी एमएस धोनी बनला. पहिल्यांदाच या संघाने पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघाला पराभवाचे पाणी पाजले. या विजयात संपूर्ण संघाने शानदार प्रदर्शन केले. यात विकेटकीपर कॅप्टन मोनंक पटेलचा रोल महत्त्वाचा होता. टुर्नामेंट सुरु होण्याआधीच त्याने आपल्या संघाचा विश्वास जिंकला होता. मोनंकने स्वत:ला सिद्ध केले आहे. संपूर्ण सामन्यात एक क्षणही असे वाटले नाही की, असोसिएट नेशन पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळत आहे.
मोनंक पटेलने धोनीसारख काय केलं?
मोनंक पटेलने धोनीसारखी परफेक्ट प्लानिंग करुन मैदानावर त्याची अमलबजावणी केली. सुरुवातीला त्याने गोलंदाजांचा खुबीने वापर केला व पाकिस्तानवर दबाव आणला. त्यांनी सामना खिशात घातला.
मोनंकची वनडेमध्ये कामगिरी कशी आहे?
अमेरिकेला विजय मिळवून देण्याची त्याची ही पहिली वेळ नाही. 2018 सालच्या आयसीसी वर्ल्ड टी-20 क्वालिफायरमध्ये अमेरिकेकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. 6 सामन्यात त्याने 208 धावा केल्या होत्या.







