हवामान शास्त्रज्ञांचा दावा
मुंबई | प्रतिनिधी |
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू असली तरी या वादळाचा कुठलाही धोका महाराष्ट्राला धोका नाही उलट ते वरदानच ठरेल असे भाकीत आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ व चक्रीवादळां तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले आहे.
चक्रीवादळ तयार होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस 200 ते 250 तास म्हणजे एक आठवड्यातून जास्त कालावधी लागतो त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ते पश्चिम बंगाल जवळ धडकेल. ते तीव्रतेने कमी शक्तीशाली असल्याने फारसे नुकसान यामुळे होणार नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही अशी माहिती ही जोहरे यांनी दिली आहे.
चक्रीवादळाला होणारा बाष्प पुरवठा हीच चक्रीवादळांची शक्ती असते. जमिनीवर धडकल्यावर साधारणतः एक तासात ते नष्ट होते व बाष्प विखुरते.त्यामुळे मगुलाबफ चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून 1 हजार 900 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करत महाराष्ट्राला विदर्भातून मुंबईच्या दिशेने जाऊन अरबी समुद्रात जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन ही जोहरे यांनी केले आहे.
तयार पिके काढून घ्या
काढणीस आलेली तयार पिके काढून घेण्यासाठी गुलाब चक्रीवादळाने बाष्प ओढून घेत महाराष्ट्रातील शेतकर्यांना पावसाची उघडीप होत सूर्यदर्शनासह चांगली संधी दिली आहे. त्यामुळे सध्या तरी मुसळधार पाऊस वाढणार नाही. काढलेले अन्नधान्य हे सुरक्षित उंच ठिकाणी व कोरड्या जागी साठवावे असे आवाहन देखील प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले आहे.