सूरताल विद्यालयाचा गुरुपौर्णिमा उत्सव

| खांदा कॉलनी |वार्ताहर |

स्वरनादब्रह्म शैक्षणिक व सांस्कृतिक कला मंडळ संचालित सूरताल विद्यालयाचा गुरुपौर्णिमा महोत्सव खांदा कॉलनीतील जनसेवा आश्रम हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला समाजसेविका राजश्री पोवार व ज्येष्ठ गायिका सूरश्री श्रीखंडे यांच्यासह आजी-माजी विद्यार्थी व पालकवर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी तबला गुरु विष्णू पांचाळ यांनी सरस्वतीचे व गुरुवर्य पं. शांताराम चिगरी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय गायन तसेच संवादिनी व तबला वादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित पालकांनी या कलाकारांना टाळ्यांच्या कडकडाटात प्रोत्साहन दिले. योगिनी वैदू, विशाखा नागोठणेकर, प्राजक्ता जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नीळकंठ धुरे यांनी आभारप्रदर्शन केले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी एकत्र येवून या कार्यक्रमाचे नियोजन करतात. आपल्या पालकांसमोर आपल्या कलेचे सादरीकरण करण्याचा आगळावेगळा आनंदही या विद्यार्थ्याना मिळतो.असे संचालिका ज्योती पांचाळ यांनी सांगितले.

Exit mobile version