गुटखा, पानमसाल्याचा साठा जप्त

gutakha

| पनवेल । वार्ताहर ।

पनवेल तालुक्यातील कळंबोली खिडुकपाडा येथील तीन पानशॉपवर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाल्याचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. पेण येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त ल. अं. दराडे, अन्न सुरक्षा अधिकारी वि. वि. शिंदे व स. रा. आढाव व त्यांच्या पथकाने कळंबोली खिडुकपाडा येथील तीन पानशॉपवर छापे मारले. येथे त्यांना गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला. त्यावर त्यांनी हा साठा जप्त करून त्यांचे शॉप सील करत रामदुलारे प्रजापती (28), श्रीराम जेस्वाल (49) आणि खजांची प्रसाद गौड (48) या तिघांना ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version