श्रीवर्धन, म्हसळ्यात गुटख्याची विक्री

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यामध्ये अवैध गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अनेक अल्पवयीन विद्यार्थी, तरुण पिढी व काही प्रमाणात महिला वर्ग देखील गुटख्याच्या सेवनामुळे व्यसनाधीन झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने श्रीवर्धनमध्ये काही पान गाद्यांवरती कारवाई करून गुटखा पकडला होता. त्यावेळी आरोपींना अटक देखील करण्यात आली होती. परंतु, वास्तविक पाहता हे काम अन्न व औषध प्रशासनाचे आहे. मात्र, गुटखा विक्रेत्यांच्या श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात मोठ्या टोळ्या असून त्यांचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांजवळ अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. येथील पान गाद्यांवरती कारवाई न करता त्यांना जे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ पुरवठा करतात, अशा मोठ्या धनदांड्या व्यापाऱ्यांवरती कारवाई होणे अत्यंत गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version