सव्वा लाखांचा गुटखा हस्तगत

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल तालुक्यातील आजिवली गाव परिसरात एका किराणा विक्री करणाऱ्या दुकानात व गोदमात पनवेल तलौक पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत जवळपास सव्वा लाख रुपये किमतीच्या गुटख्याचा साठा हस्तगत केला आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. रामसौदागर सहदेव भगत (65) असे आरोपीचे नाव आहे.

तालुक्यातील आजिवली गाव येथील एका किराणा दुकानात तसेच गोदामात कायदेशीररित्या गुटख्याचा साठा करून त्याची विक्री सुरु असल्याची गोपनीय माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे यांना मिळाली. माहितीनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिरुद्ध गिजे, पो उपनि हर्षल राजपूत, दीपक शेळके, पोहवा देवरे, धुमाळ, कुदळे, तांडेल, बाबर, म्हारसे, पवार, मपोहवा रोडगे, पोहवा पाटील, सोशी भगत आदींच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत आरोपीकडून जवळपास सव्वा लाख रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा केशर युक्त विमल पान मसाला हस्तगत केला.

Exit mobile version