तळोज्यात लाखोंचा गुटखा जप्त

| पनवेल | प्रतिनिधी ।

तळोजा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकासह घोटगाव परिसरात छापा टाकून तब्बल 6 लाख 68 हजार 152 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित वितरक, पुरवठादार आणि उत्पादकांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळोजा घोटगाव परिसरातील एका घरामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तळोजा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी सचिन आढाव आणि त्यांच्या पथकासह संशयित घरावर छापा टाकला. तपासणीदरम्यान खोलीमध्ये विविध ब्रँडचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, जर्दा, खैनी आणि सुगंधी सुपारी असा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने हा संपूर्ण माल जप्त केला.

Exit mobile version