चार माफियांना अटक
| महाड | प्रतिनिधी |
महाड शहर आणि बिरवाडी परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या छाप्यात सुमारे आठ लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात यात आला. त्याच बरोबर चार गुटखा माफियांवर कारवाई करण्यात येऊन येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. महाड पोलिसांनी तंबाखूजन्य प्रतिबंधित पदार्थाची विक्री करणार्यांवर कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू केली.
महाड तालुक्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते त्याच प्रमाणे खुलेआम काही दुकानातून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे शहरात तसेच बिरवाडी मध्ये पोलिसांनी शनिवारी दुपारनंतर धडक कारवाई करून सुमारे आठ लाख रुपयाचा गुटका जप्त केला, सर्वात आश्चर्य असे की बहुतांशी साठा हा कापड दुकान आणि किराणा मालाच्या दुकानात आढळून आला, या कारवाईमध्ये चार गुटका माफियांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी बिरवाडी तील निलेश जीवन मोरे वय 46 रा,बिरवाडी ता,महाड याच्या दुकानातून 1 लाख 47 हजार 40 रुपये किमतीचा गुटका जप्त केला. याप्रकरणी आशुतोष म्हात्रे पोलीस हवालदार महाड शहर यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश माथुराम माळी वय 39,शुभंकर कॉम्प्लेक्स रुम नं1 पहीला मजला जुना पोस्ट महाड राजेश जयंवत थरवळ वय 51 थरवळ बिल्डिंग महाड समीर वसंत पारेख वय 47 ,सरकेरआळी महाड यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात काँ गु.रजिस्टर नं62/2020 भादंवी कलम 188. 273. 328 . नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश माथुराम माळी यांच्या मारुती मेन्स वेअर या दुकानामध्ये तसेच राजेश जयवंत थरवळ यांच्या जुना पोस्ट येथील ओमसाई शिव पान कॉर्नर या दुकानामध्ये तसेच सरेकर आळी येथील समीर पारेख यांच्या घराच्या पाठिमागील खोलीत धाड टाकून तब्बल 6 लाख 7 हजार 40 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे महाड शहर पोलीसांनी केलेल्या गुटखा संदर्भातील आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याची चर्चा महाड शहरात ऐकायला मिळत आहे.
याप्रकरणी महाड शहरात पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पी.एस कापडे हे अधिक तपास करीत आहेत महाड शहरातून पोलिसांनी 6 लाख 57 हजार रुपये किमतीचा गुटका जप्त केला. पोलिसांनी रमेश माळी राजेश थरवळ आणि समीर पारेख या तिघांना महाड मधून अटक केली तर निलेश मोरे याला बिरवाडी तुन अटक केली आहे, महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खोपडे आणि एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आंधळे पुढील तपास करीत आहेत.