पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील आमनोली येथील विवाहित महिला आणि तिच्या सहा वर्षीय मुलीचा एका तीस वर्षीय व्यक्तीने घरात घुसून विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यासंदर्भात पाली पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.7) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पाली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 5) दुपारी ते शुक्रवारी (ता.6) दुपारी 2 च्या दरम्यान हा गुन्हा घडला. या घटनेतील पीडित महिला घरात झोपलेली असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. तसेच या महिलेची सहा वर्षाची मुलगी आंघोळ करत असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. याबरोबरच तू शाळेमध्ये चल मी तुला चॉकलेट देतो असे बोलून वेळोवेळी पाठलाग करून तिचा करून विनयभंग केलेला आहे, असे पाली पोलीस ठाण्यातील फिर्यादीमध्ये नोंद केले आहे. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे या करीत आहेत.