खेडमध्ये जंगल तोड माफियांच्या हैदोस

। खेड । वार्ताहर ।
नैसर्गिक र्‍हासामुळे उद्भवणार्‍या संकटांचा प्रत्यक्ष सामना करूनही कोकणात शहाणपणाची जाग येण्याची चिन्ह दिसत नाहीत. कारण तालुक्यातील अनेक ठिकाणी बेसुमार जंगलतोड सुरू असून वनविभागाचे त्याकडे लक्ष नसल्याचे चित्र समोर आले आहे.
कोकण विभागात विशेषतः दक्षिण कोकणात नैसर्गिक विविधता विपुल प्रमाणात आढळते. आधुनिक जगता विज्ञानामुळे विनाश ही उक्ती खरी होत आहे. मानवी हव्यासामुळे या जैवविविधतेला धोक ा पोहचत असून निसर्गाचा समतोल ढासळत आहे. खेड तालुक्यात हा हव्यास वाढल्यामुळे विविध ठिकाणी जंगलतोड होत आहे. कोकणाने नुकताच यासंदर्भातील संकटांची मालिका अनुभवी असूनही पुन्हा त्याची पुनरावृत्ती होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मात्र अशा वेळी प्रशासन कान्हा डोळा का करीत आहे? वेळेच यावर कारवाई करून आवश्यक ती भूमिका का घेत नाही? वनविभाग शांत का? असे विविध प्रश्‍न जनसामांन्यामधून उपस्थित करण्यात येत आहेत.

Exit mobile version