। पनवेल । वार्ताहर ।
आबासाहेब बेडसे चारिटेबल ट्रस्ट, लाईफ लाईन हॉस्पिटल पनवेल आणि इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आगळावेगळा हळदी कुंकाचा कार्यक्रम आरोग्याचे वाण देऊन साजरा करण्यात आला. या समारंभाचे उद्घाटन वर्षा ठाकूर, नेहा देशमुख, अर्चना ठाकूर, सुलोचना कल्याणकर, माधुरी गोसावी, डॉक्टर जयश्री पाटील, डॉक्टर केतकी पाटील-म्हस्के, डॉक्टर जानवी पाटील, कल्पना नागावकर, वृषाली सावळेकर, सई कांडपिळे, डॉक्टर विद्याताई पाटील या सर्वांनी दीप प्रज्वलन करून हळदी कुंकूच्या निमित्ताने आरोग्याचे वाण या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
हळदी कुंकूच्या कार्यक्रमांमध्ये जे आरोग्याचे वाण देण्यात आले त्यामध्ये 250 महिलांच्या आरोग्य तपासणी केल्या गेल्या त्यामध्ये बीएमडी म्हणजेच शरीरातील कॅल्शियमचे तपासणी, हिमोग्लोबिन, रक्तातील लोहच प्रमाण, रक्तातील साखर, ब्लड प्रेशर, वेट, बी एम आय, अशा अनेक टेस्ट करण्यात आला, असा हा आगळावेगळा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आरोग्याचे वाण देऊन साजरा करण्यात आला.
पनवेल इंडस्ट्रियल टाउनतर्फे हळदीकुंकू
