| पनवेल | प्रतिनिधी |
इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन चा पदग्रहण सोहळा नुकताच काकाजीनी वाडी, अकुर्ली येथे प्रा. वृषाली मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न झाला. यावेळी कल्पना नागावकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सभेमध्ये मावळत्या अध्यक्षा वृषाली सावळेकर यांनी पीपीटीद्वारे आपल्या कामाचा आढावा सादर केला. नागावकर यांनी ा नवीन टीम ची ओळख करून दिली. डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे यांनी व्हिडीओ द्वारे नुतन अध्यक्षा कल्पना नागवकर आणि टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी दहा नवीन सभासदांना क्लब चे सदस्यत्व देण्यात आले.
या वर्षीच्या थेीज्ञ थेपवशीी या थिमला अनुसरून खेड्यातील आणि आदिवासी पाड्यावरील गरीब व गरजू महिलांच्या आरोग्यासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी, कॅन्सर जनजागृती साठी जास्तीत जास्त काम करण्याचा मानस असल्याचे नूतन अध्यक्षा कल्पना नागावकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. क्लब एडिटर शीतल गायकवाड संपादित प्रतिबिंब या बुलेटिन चे प्रकाशन वृषाली मगदूम यांनी केले. डॉ. शोभना पालेकर यांनी क्लब सीसी ज्योती गुंदेचा यांच्या क्लब फेलोशिप डायरीचे उद्घाटन केले. नूतन अध्यक्षा कल्पना नागावकऱ यांनी प्रमुख पाहुण्या वृषाली मगदूम, मावळत्या अध्यक्षा वृषाली सावळेकर, सेक्रेटरी निता बोराडे यांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला.
यावेळी इनरव्हील सदस्य, डॉक्टर बाहुबली नागावकर, डॉक्टर प्रकाश पाटील, रोटेरियन सुधीर कंडपीळे, सलील पालवणकर, इतर क्लबचे पदाधिकारी, निमंत्रित पाहुणे उपस्थित होते. सगळयांचे रोपे देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. जयश्री पाटील आणि अॅड. शिल्पा नागावकर यांनी केले. नूतन कमिटी पुढीलप्रमाणे ः- सेक्रेटरी- सई पालवणकर, आयपीपी- वृषाली सावळेकर, व्हाईस प्रेसिडेंट -निता बोराडे, आयएसओ- पल्लवी मुणोत, सीसी -ज्योती गुंदेचा, एडिटर- शितल गायकवाड, अॅडव्हायझरी कमिटी -डॉ.साधना गांधी, डॉ.जयश्री पाटील, शुभांगी वालेकर , स्नेहल गोवेकर, रेखा कांडपीळे.