। सुधागड । वार्ताहर ।
सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्वानाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पूर प्रिसिहिती निर्माण झाली असून सुधागड-पाली तालुक्यातील जांभूळपाडा ते कळंब रस्ता बंद करण्यात आला आहे. खालापूर तालुक्यात खोपोली-पाली रस्त्यापासून तुकसई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अंबा नदीवर असणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात असून, तालुका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.