| अलिबाग | वार्ताहर |
जनता शिक्षण मंडळ प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा सारळ येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती अंतर्गत लेक (मुलगी) हि संकल्पना ठेवून हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी डॉ. साक्षी गौतम पाटील उपाध्यक्षा जनता शिक्षण मंडळ अलिबाग, शरयू कोयंडे, अमृता नाईक, शिवानी नाईक शाळेचे मुख्याध्यापक संतोष मढवी तसेच प्राथमिक, पूर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सारळ सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या. शाळेच्या स्थानिक शाळा समितीच्या अध्यक्षा भावना सुभाष पाटील यांचा सुद्धा हळदीकुंकू शाळेत साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास सुमारे 175 महिला पालक उपस्थित होत्या.