काजुवाडीत महिलांना ब्लँकेटचे वाटप
| खोपोली | प्रतिनिधी |
राजस्थानी महिला मंडळ मागील अनेक वर्षांपासून खोपोलीसह खालापूर तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब मुलींना मदतीचा हात दिला आहे. नुकतेच काजुवाडीतील 100 हून अधिक महिलांना ब्लँकेट वाटप केले आहे.
राजस्थानी महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा अजया जाखोटीया, अध्यक्ष पुष्पा श्री. जाखोटीया, सक्रेटरी संगीता जाखोटीया, सदस्या संगिता जाखोटीया, सुषमा जाखोटीया, पुष्पा जाखोटीया, सीमा जाखोटीया, जशोदा जाखोटीया आदी उपस्थित होत्या. काजुवाडीतील सामाजिक कार्यकर्त्या चंदा पाटील आणि रविना पाटील यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान, काजुवाडीतील महिलांना ब्लँकेट भेट दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.