शेकापक्षातर्फे रामराज बाजारपेठेत रविवारी हळदीकुंकू

अभिनेत्री श्रेया बुगडे यांची प्रमुख उपस्थिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असून रविवार दि. 27 फेबु्रवारी रोजी दुपारी 3 वाजता रामराज बाजारपेठ येथे होणार्‍या या समारंभाला चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे या प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. चिंचोटी, रामराज, बोरघर, सुडकोली या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या हळदीकुंकू समारंभाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version