सिनेतारकांची उपस्थिती
| माणगाव | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्ष व माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे मित्रमंडळातर्फे शनिवार, दि.9 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता राजमाता जिजाऊ मैदान, गोरेगाव, ता. माणगाव याठिकाणी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सुंदर आमचे घर मालिकेच्या अभिनेत्री संचिता कुलकर्णी, स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या अभिनेत्री स्वरा ठिगळे, बॉस माझी लाडाची मालिकेची अभिनेत्री भाग्यश्री लिमये यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. या कार्यक्रमात 3500 महिला सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली असून, संपूर्ण माणगाव तालुक्याचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागून असल्याची माहिती तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना दिली.
या कार्यक्रमास शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, शिवसेनेचे आ. भरत गोगावले, शेकापचे माजी आमदार पंडित पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी केले आहे.