| कोलाड | वार्ताहर |
कोलाड विभाग नाभिक तरुण मंडळाच्या वतीने कोलाड येथील शिवनेरी मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कोलाड विभागातील नाभिक समाजातील असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोलाड पोलीस अधिकारी नितीन मोहिते राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहा तालुका अध्यक्ष प्रतिम पाटील व सुनिता सुरेश महाबळे रोहा पंचायत समिती सभापती यांच्या शुभहस्ते सर्व महिलांना सौभाग्याचे हळदीकुंकू व वाण देण्याचे कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप भगत यांनी केले या वेळी महिलांचा खेळ पैठणीचा, तळ्यात मळ्यात , कोण नाही कोणचा आणि डाळ भात लोणचा, बलुन बॅलन्स , महिलांच्या उखाणे यांच्या स्पर्धा व गेम्स घेऊन महिलांना प्रोत्साहित करण्यात आले .