| कोर्लई | वार्ताहर |
भारतीय प्रजासत्ताक दिन व मकरसंक्रांतीचे औचित्य साधून मुरुडमध्ये महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ सिमा जनार्दन कंधारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. शहरातील सुभाषचंद्र बोस मार्गावरील राजयोग बंगला येथे रविवारी (दि.28) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांना तीळगुळ, पुष्प, हळदी-कुंकू व सौभाग्य वाण देण्यात आले. कार्यक्रमाला मुरुड शहर तसेच आजुबाजूच्या परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.