। उरण । वार्ताहर ।
उरण म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.2) उरण नगरपरीषद कार्यालय येथे नगरपरीषदेमधील सर्व महिलांनी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने संतोष पवार आणि मधूकर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिलांना आरोग्य ही धनसंपदा या विषयावर सन्माननीय डॉ.प्रिती प्रदिप बाबरे मॅडम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी डॉक्टरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कुटूंबाची अखंडीतपणे काळजी घेण्यासाठी महीलांनी पहिले स्वतःची काळजी घेणे, स्वतःसाठी वेळ देणे आवश्यक आहे. जर स्वतःसाठी वेळ देऊन आरोग्य ठणठणीत ठेवले तर तीच महीला संपूर्ण कुटुंबाला आधार देऊ शकते. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालले पाहिजे आणि चालण्याचा फायदा काय होतो, हे समजून सांगितले.
डॉक्टर प्रीती बाबरे (75) यांनी आपल्या उरण वासियांना तब्बल 48 वर्ष आरोग्य सेवा दिल्या बद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका कोळी, जानवी पंडीत, आशा शेलार उपस्थित होत्या.