लेडीज स्पेशल ग्रुपचा हळदीकुंकू कार्यक्रम

| माथेरान | वार्ताहर |

पनवेल येथील लेडीज स्पेशल ग्रुपच्या वतीने हळदीकुंकू समारंभ के.व्ही. कन्या शाळेमध्ये उत्सहात पार पडला. या समारंभात सुमारे 60 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला. नृत्य, गायन, उखाणे तसेच इतर कार्यक्रमांमुळे समारंभास रंगत आली. या ग्रुपच्या संस्थापिका शशी देसाई यांच्या हस्ते समारंभाला सुरुवात करण्यात आली.

8 वर्षापूर्वी ग्रुपची स्थापना झाली असून या लेडीज स्पेशल ग्रुपमध्ये विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महिलांचा समावेश असून वेगवेगळ्या विचारसरणीच्या महिलांना एकत्र आणण्याचे काम शशी देसाई यांनी केले आहे. प्रत्येक संकटाच्यावेळी या ग्रुपमधील महिलांचा सहभाग असतो. कोरोनामुळे दोन वर्षे सार्वजनिक कार्यक्रम झाले नव्हते. त्यामुळे यावर्षी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. महिलांनी पारंपारिक उखाणे घेऊन कार्यक्रमाला रंगत आणली. वेगवेगळ्या स्पर्धांतून जिंकलेल्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. आगामी काळात महिलांना खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षम करण्यासाठी तसेच गरजूंना मदत करण्यासाठी हा ग्रुप प्रयत्नशील असणार आहे.

यावेळी सुरेखा मोहोकर, वैजंता तांबोळी, प्रज्ञा जाधव, हेमा गोतमारे यांच्या नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढली. तसेच एकपात्री अर्चना रसाळ व गायन शमा ठाकूर, भारती मोहिते यांनी महिलांचा उत्साह वाढवला.

Exit mobile version