हेल्सच्या निवृत्तीने इंग्लंडला धक्का

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

एकेकाळी त्याच्यावर ड्रग्समुळे बंदी आली होती. या प्रकरणामुळे त्याला विश्वचषकात खेळता आले नव्हते. पण त्याने हार मानली नाही. या प्रकरणातून बाहेर आला. पुन्हा एकदा त्याने मेहनत घेतली. संघात पुन्हा एकदा तो परत आला. विश्वचषकासाठी मैदानात उतरला आणि आपल्या संघाला त्याने विश्वचषक जिंकवून दिला. पण आता तो चर्चेत आला आहे तो एका धक्कादायक गोष्टीमुळे. कारण आता त्याने अचानकपणे निवृत्ती घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.ही गोष्ट आहे इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज ॲलेक्स हेल्सची.

ही गोष्ट आहे 2019 सालची. क्रिकेट विश्वचषक ऐन तोंडावर आला होता. जोरदार तयारी सुरु झाली होती. पण या विश्वचषकापूर्वी तो ड्रग्सच्या टेस्टमध्ये फेल झाला. त्यामुळे उत्तेजक सेवन केल्याप्रकरणी संघाबाहेर काढण्यात आले. आपल्या संघ सहकाऱ्यांना त्याने विश्वचषक खेळताना टीव्हीवरून पाहिले. पण तो हताश झाला नाही. उलट तो त्वेषाने पेटून उठला. त्यानंतर त्याने जोरदार मेहनत केली. त्यानंतर देशाच्या संघात स्थान मिळवले. 2021 चा विश्वचषक आला होता. त्याने जोरदार तयारी केली आणि आपल्या संघाला विश्वचषक जिंकवून देण्यात त्याने मोलाची जबाबदारी पार पाडली. पण सध्या तो चर्चेत आला आहे तो आपल्या अचानक घेतलेल्या निवृत्तीमुळे. ही गोष्ट आहे इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज ॲलेक्स हेल्सची.

निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधताना हेल्स म्हणाला, मी इंग्लंडसाठी तिन्ही क्रिकेटच्या प्रकारांमध्ये एकूण 156 सामने खेळले आहेत, ही भाग्याची गोष्ट आहे. मी काही आठवणी आणि काही मैत्री आयुष्यभर टिकवून ठेवल्या आहेत आणि मला वाटते की पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. इंग्लंडच्या जर्सीमध्ये माझ्या संपूर्ण काळात मी काही सर्वोच्च क्षणांचा अनुभव घेतला आहे. हा एक अविश्वसनीय प्रवास आहे आणि इंग्लंडसाठी माझा शेवटचा सामना ठराल होता तो विश्वचषक फायनल. तो जिंकण्यात मला खूप समाधान वाटत आहे. आता मी निवृत्तीचा निर्णय घेतला असून यानंतर मी इंग्लंडकडून खेळताना दिसणार नाही. पण माझे क्रिकेट मात्र थांबणार नाही, हे मात्र निश्चित.

Exit mobile version