आझाद मैदानात शिक्षकांचे अर्धनग्न आंदोलन

। पाली/गोमाशी । प्रतिनिधी ।

शिक्षक समन्वय संघाच्या वतीने 16 ऑगस्ट 2024 पासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षकांच्या प्रमुख मागण्यासाठी हुंकार आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून गेले 49 दिवस शिक्षक आझाद मैदानात सहनशीलतेच्या मार्गाने हुंकार आंदोलन करत होते.

शासन प्रत्येक वेळी येण्यार्‍या कॅबिनेटच्या बैठकीला अनुदानाच्या टप्प्याचा विषय घेतला जाईल अशी उडवा उडवीची उत्तरे देत आहे. मात्र गुरुवारी या समनव्य संघाच्या हुंकार आंदोलनाने उग्ररूप धारण केले. आंदोलनकर्त्यांनी भरदुपारी अर्धनग्न आंदोलन करून शासनाच्या विरोधात बोंबा मारून जाहीर निषेध केला. यावेळी महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने अंशतः अनुदानित शिक्षक उपस्थित होते. जो पर्यंत होणार्‍या कॅबिनेट सूचीमध्ये शिक्षकांच्या टप्पा वाढीचा विषय येत नाही; तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा इशारा यावेळी शिक्षक समनव्याच्या वतीने शासनाला देण्यात आला.

Exit mobile version