पहिल्याच पावसात ‘हा’ रस्ता बंद; ३५ गावातील नागरिकांचे हाल

। नेरळ । प्रतिनिधी ।
गेले दोन दिवस पडत असलेल्या पहिल्याच पावसात नेरळ – कळंब रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली तर रस्त्यावरून पाणी जात असल्याने स्थानिकांना आपल्या घरात कोंडून घेण्याची वेळ आली. दरम्यान, प्रशासन स्थानिक पातळीवर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करणार्‍या बिल्डर लॉबीवर कारवाई करीत नसल्याने हि समस्या गेली काही वर्षे सतत निर्माण होत आहे. सतत दोन दिवस हि परिस्थिती निर्माण झाल्याने स्थानिक आणि आसपास च्या 35 गावातील लोकांचे हाल झाले.


नेरळ विकास प्राधिकरणमधील बांधकामे मोठ्या प्रमाणात नेरळ-कळंब रस्त्यावरील धामोते गावाच्या हद्दीत झाली आहेत. ही बांधकामे करताना मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून जमीन सपाट करून घेण्यात आली आहे. त्यापूर्वी या सर्व ठिकाणी भातशेती होती. मात्र शेत जमिनीची विक्री झल्यानंतर त्या जमीनीचे सपाटीकरण करण्यासाठी मातीचा भराव केल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने 2017 मध्ये पासून थोडा जरी पाऊस झाला तरी रस्त्यावरून पाणी जाऊन वाहतूक बंद पडते. त्यामुळे थेट विधानसभा अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर नेरळ विकास प्राधिकरण, रायगड जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्त्याच्या कडेला पाणी जाण्याचे मार्ग मोकळे करून देण्याची सूचना केली होती. मात्र तेथील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही नियोजन केले जात नाही.


पावसाळा सूरु झाला तरी नेरळ-कळंब रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कोणत्याही बिल्डरने पाणी जाण्याची उपाययोजना केली नाही. त्यामुळे नेरळ-कळंब रस्त्यावर रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने संपूर्ण धामोते परिसर जलमय झाला आहे. परिणामी ते पाणी जाण्याचे बहुतेक सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे ते सर्व पाणी नेरळ-कळंब रस्त्यावर आले असून वाहतूक खोळंबून राहत आहे.


प्रशासन बिल्डर लॉबीवर आपला अंकुश ठेवत नसल्याने रस्त्यावर पाणी साचून वाहतूक बंद पडत आहे. नेरळ-कळंब रस्त्याने परिसरातील 30 हुन अधिक गावातील लोकांची वाहतूक सुरू असते. यावर्षी 4 जुलै रोजी काही तास पाऊस या भागात झाला आणि रस्त्यावरून पाणी वाहत जाऊ लागले. त्याचा फटका संध्याकाळच्या वेळी घरी परतत असणारे शाळेचे विद्यार्थी तसेच नोकरदार यांना बसला. तर कांहींनीं बोपेले येथून तळवडे पुलावरून कळंब रस्त्याचा पर्याय निवडला

Exit mobile version