अलिबागमधून “हॅम” नी साधला जगभरात संवाद

| अलिबाग | भारत रांजणकर |
भारतासह जगभरातील युरोप, मिडल इस्ट, साउथ इस्ट, ऑस्ट्रेलिया अशा 60 ते 65 देशांमध्ये अलिबाग मधून हॅम ऑपरेटरर्स नी संवाद साधला. एआरएसआर दर वर्षी हॅम रेडियो चालकांना प्रोत्साहन देण्याचे हेतुने स्पर्धा आयोजित करते. यंदा 25 व 26 फेब्रूवारी 2022 रोजी ही स्पर्धा अलिबाग चेंढरे येथे घेण्यात आली होती. या वर्षी एकूण 41 हॅम संघानी भाग घेतला होता. अलिबाग येथे उभारण्यात आलेल्या रेडीओ केंद्राच्या माध्यमातून अलिबागचे दिलीप बापट, ज्येष्ठ हॅम रेडीओ ऑपरेटर एम एस कामत, दिनेश पटेल, चारुदत्त उपलाप, राजेश हुद्दार, श्रीपाल, चंद्रशेखर, जतिन शाह,डॉ राहुल घाटवल, पर्सी जसावाल आदींनी स्पर्धेत भाग घेऊन जगभरात संदेश पाठविले होते. त्यासाठी हॅम रेडियो इतर साहित्य मुंबईहून आलेल्या सहकार्यांनी आणले होते तसेच दिलीप बापट यांनी आपल्याकडील रेडियोचाही वापर केला होता.

आपत्ती व्यवस्थापनावेळी आपण जास्तीत जास्त किती लांब अंतरावर किती संपर्क करु शकतो, याची रंगीत तालीम म्हणून या स्पर्धेकडे पहिले जाते. एचएफव्ही, एचएफ यु एचएफ, एफटीएट अशा प्रकारचे वेगवेगळे प्लॉटफार्म संपर्कासठी वापरले जातात. या प्रकारातून अलिबाग येथून इंडोनेशिया, मलेशिया, अबुधाबी, मस्कत, मिडल इस्ट अशा 60 ते 65 देशांशी तसेच भारतभर संपर्क साधण्यात आला होता. या स्पर्धेदरम्यान वायरलेस पी आय आर बी पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी भेट दिली. अलिबाग हे विद्युत (इलेक्ट्रिकल) व्यतय आणणारे ठिकाण आहे. त्यामुळेच इथे भूचुंबकिय वेधशाळा आली आहे. त्याचप्रमाणे बिनतारी लहरी साठी पाणी हे सुवाहक आहे. अलिबागची भूमी ही याला पोषक आहे. अलिबागहून थेट सुवेझ कॅनल, हिंदी महासागर आणि बंगाल उपसागर अशा सागरी मार्गातून हे संदेश वहन सोपे होते.

Exit mobile version