चला मामाच्या गावाला अलिबागला
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या मुला मुलींसाठी (दि.8) मे पासून (दि.14) मे पर्यंत निवासी जंगल शिबिराचे आयोजन हॉटेल पर्णकुटी येथे करण्यात आले आहे. तालुक्यातील जगप्रसिद्ध समुद्र किनारे, गडकिल्ले, ऐतिहासिक मंदिरे, निसर्गाने नटलेल्या नारळीपोपळी, आंबा केळीच्या बागेत,समुद्राच्या वाळूत लाटांच्या आवाजात प्रसन्न अशा इतिहासकालीन नाव असलेले वरसोली, अलिबाग येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरात जगप्रसिद्ध अलिबाग येथील वेधशाळेत भेट, चंद्र तारे, आकाश दर्शनाची माहिती, कार्ले खिंडीतील महाराष्ट्रशासनाच्या जंगलातील झाडांची ओळख व जंगलात व शेतात वणवा लागला, घरात मोठी आग लागली तर ती विजवण्याचे तज्ञांकडून प्रात्यक्षिक, नागाव, चौल, रेवदंडा,साळाव येथील मंदिरे, कनकेश्वर गड स्पर्धा, जगप्रसिद्ध शिल्पकार करमकर यांच्या संग्रहालयास सासवणे येथे भेट व मांडवा वरून समुद्र मुंबई दर्शन, आशियातील प्रसिद्ध कारखाना आरसीएफ थळ ची दुरुन भेट अलिबागचा सरखेल कान्होजी आंग्रे यांचा कुलाबा किल्ला व त्यांचा निवास परिसर, भारतीय सेनादलातील पोलीस, दलातील निवृत्त अधिकाऱ्यांची भेट.
स्थानिक आजी-आजोबांची भेट, अलिबाग तालुक्यातील प्रसिद्धसमाजसेवक लेखक, कवी, सरकारी अधिकारी, चित्रकार, संगीतकार, जिल्हा व राज्य, विदेश पातळीवर पुरस्कार प्राप्त सन्माननीय नागरिकांची भेट, अलिबाग व वरसोली समुद्रकिनारी शंख शिपले जमा करणे, वाळूचे किल्ले बांधणे, घोडा गाडी, बैलगाडी मध्ये सफर, गोटया, लगोरी, क्रिकेट, रुमाल-टाळी, नृत्य, गायन, भाषण, नेमबाजी, लांब उडी, धावणे, निबंध, वकृत्व, फोटोग्राफी, अभिनय, वेशभूषा, संस्कृत पठण, स्पर्धा, सोबत कायद्याची ओळख, आपत्ती सुरक्षा माहिती, भेसळ प्रतिबंध व ग्राहक कायद्याची माहिती याचे मार्गदर्शन होणार आहे.
शिबिरार्थीला सकाळी चहा, नाश्ता दुपारी भोजन, सायंकाळी चहा, बिस्किटे रात्रीचे भोजन शाकाहारी मांसाहारी राहण्याची व्यवस्था आहे. येथील सर्व जबाबदारी सत्यम मामा पाहणार आहे. जो रायगडचा युवक फाउंडेशनचा खजिनदार व भारत सरकारचा हॅम रेडिओ लायसन धारक आहे. यासाठी प्रत्येकी रुपये 8500/- असा खर्च असूनआपल्या पाल्याची, पुतण्याची भाचा-भाचीची नोंदणी रुपये 500/-नी करावयाची आहे. सर्व सहभागी मुला-मुलींना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग ची सीडी येणार आहे. मागील वर्षी 30 मुला-मुलींनी लाभ घेतला होता. या शिबिरात सहभागी होणार असलेल्या साठी नोंदणी करण्यारांना कार्यक्रम रूपरेषा, नोंदणी अर्ज पाठविण्यात येईल असे आवाहन अदिवासीसेवक, रायगड भूषण, डॉ.जयपाल पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.