समुद्रकिनार्‍यावरील अतिक्रमणांवर हातोडा

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
येथील समुद्रकिनार्‍यावरील बंदर विभागाच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमण करणार्‍या 22 खोकेधारकांची बांधकामे तोडण्यास बंदर विभागातर्फे तोडण्यात आली. राजकीय पक्षांतर्फे आणि नागरिकांतर्फे कारवाई होऊ नये, म्हणून आटोकाट प्रयत्न करण्यात आले. मात्र, प्रादेशिक बंदर अधिकार्‍यांनी भूमिकेवर ठाम राहत ही कारवाई केली.
गुहागरच्या किनार्‍यावरील बंदर विभागाच्या मालकीच्या सर्व्हे नं. 214 या जमिनीतील सर्व अनधिकृत बांधकामे विनाविलंब हटविण्यात यावीत. अन्यथा, 12 ऑक्टोबरला अतिक्रमण हटवू, अशी अंतिम नोटीस पालशेत येथील सहायक बंदर निरीक्षकांनी 22 खोकेधारकांना दिली होती. पहिली नोटीस आल्यावर ही कारवाई थांबवावी, म्हणून काही खोकेधारकांनी न्यायालयाकडे दाद मागितली आहे. मात्र, शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याने न्यायालयाकडून ङ्गजैसे थेफ परिस्थिती राहील, असा कोणताही आदेश अद्याप आलेला नाही.

त्यामुळे बंदर विभागाने नोटिसीत जाहीर केल्याप्रमाणे अतिक्रमण हटविण्याची भूमिका घेतली. बंदर खात्याची ही जिल्ह्यातील सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. या प्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी विनायक उगलमुगले, बंदर अधीक्षक बोरगे, पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन बारी, महावितरण, महसूल, नगरपंचायतचे अधिकारी उपस्थित होते.
कारवाईवेळी माणुसकीचे दर्शन घडले. अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू झाल्यानंतरही बंदर खात्याचे सर्व अधिकारी खोकेधारकांना मदत करत असल्याचे दिसून आले. अनेक खोक्यांमधील महत्त्वाचे सामान काढणच्यासाठी बंदर खात्याचे निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, शिपाई हे खोकेधारकांना सामान उचलण्यास मदत करत होते. सामान उचलून होत नाही, तोपर्यंत अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरवात होत नव्हती.

Exit mobile version