रेवदंडा मोठे बंदर येेथील अतिक्रमणाने चक्क खेळाचे मैदानच गिळकृत
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा मोठे बंदर येथे अतिक्रमण करण्यात आलेले आहे. या अतिक्रमणाने खेळाचे मैदानच गिळंकृत केल्याने सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे अतिक्रमण हटविण्यात न आल्याने लवकरच उपोषण अथवा वेगळया मार्गाने आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे.रेवदंडा मोठे बंदर येथील ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकारी, अलिबाग प्रांताधिकारी, अलिबाग तहसिलदार, रेवदंडा तलाठी व रेवदंडा ग्रामपंचायत यांना हे अतिक्रमण हटविण्यात यावे असे तक्रार निवेदन दिले होते. या तक्रार निवेदन अर्जाची दखल घेण्यात येऊन शासनाचे वतीने रेवदंडा तलाठी, रेवदंडा ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचे उपस्थितीत शासकीय यंत्रणा राबवित हे बेकायशीर अतिक्रमण हटविण्यात आले. परंतु काही तासाचे अवधीतच मुजोरीने पुन्हा अतिक्रमण करून बेकायशीरपणे याजागेत ताबा कब्जा करण्यात आला.
रेवदंडा मोठे बंदर येथे समुद्र लगत पुर्वीचे 254 व सध्याचे बदलेले नवीन 185 सर्वे नंबर मधील मलई क्षेत्र म्हणून असलेली जागा गुरे चरण्यासाठी व तसेच स्थानिक मुले खेळाचे मैदान म्हणून वापर असे, या जागेत मुजोरीने अतिक्रमण करण्यात येऊन या जागेत बेकायदेशीर कुंपण बांधून ताबा कब्जा निर्माण केला आहे. यामुळे येथील स्थानिक मुलांचे खेळण्याचे मैदान हरवले, व गुरेढोरे यांना चरण्यासाठी जागा नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली. याबाबत मोठे बंदर ग्रामस्थांनी एकत्रीत येऊन जिल्हाधिकारी, अलिबाग प्रांताधिकारी व अलिबाग तहसिलदार, रेवदंडा तलाठी, रेवदंडा ग्रामपंचायत यांना दिले होते. चक्क मुलांचे क्रिकेट खेळण्याचे मैदान या अतिक्रमणाने गिळकृत करण्यात आले, या मुजोरीने स्थानिक मोठे बंदर ग्रामस्थांनी संप्तत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या जागेवर मुजोरीने अतिक्रण केल्याने स्थानिक मुलांनी खेळायचे कुठे? तसेच येथील गुरेढोरे चरण्यासाठी कुठे सोडायची हा सवाल स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
रेवदंडा मोठे बंदर ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रार निवेदन अर्जाची शासकीय दरबारी दखल घेण्यात आली, तसेच या जागेतील बेकायदेशीर कुंपण हटवून अतिक्रमण हटविण्यात आले, शासनाची कारवाई असून सुध्दा मुजोरीने पुनस्यः अतिक्रमण करण्याराचे विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून शासनाचे वतीने कायदेशीर गुन्हा मुजोरीने अतिक्रमण करणार्यांवर करण्यात दाखल करावा तसेच रेवदंडा मोठे बंदर परिसरात नव्याने अतिक्रमण करण्यात आले असून बेकायदेशीर पणे सरकारी जागेतताबा कब्जा निर्माण केला आहे हे सर्व शासनाने धडक कारवाई राबवित हटविण्यात यावे अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
मात्र अदयापी कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने मोठ बंदर येथील ग्रामस्थांनी संप्तत प्रतिक्रिया व्यक्त केली असून अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीस जोर धरला आहे, अतिक्रमण हटविण्यास न आल्यास यापुढे उपोषणास बसण्याचा तसेच वेगळया मार्गाने आंदोलन छेदण्याचे मनोगत मोठे बंदर ग्रामस्थ सुरेखा हाडकर हिने व्यक्त केले आहे. याबाबत रेवदंडा महसुल विभागाचे तलाठी शिंघे यांचेशी संपर्क केला असता, रेवदंडा मोठे बंदर येथील अतिक्रमणा बाबत वरिष्ठांना माहिती दिली आहे, व कळविण्यात आले असून, वरिष्ठाचा आदेश मिळाला की, कारवाई करण्यात येईल असे म्हटले.